Hooliganism in Pune : पुण्यात गुंडांचा धुडगूस; सिंहगड रस्ता परिसरात दुकानदारांना मारहाण

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सराईत गुंडांनी (Hooliganism in Pune) धुडगूस घातल्याच्या अनेक घटना उघडकीस आले आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी मोक्कासारख्या कारवाई देखील केले आहेत. परंतु असे असले तरीही शहरातील गुन्हेगारी काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

सिंहगड परिसरातील नर्हेत गुंड व त्यांच्या साथीदारांनी शनिवारी रात्री चांगलाच राडा घालत येथील दुकानदारांना धमकावून दहशत माजविली. तत्पुर्वी या टोळक्याने पुर्ववैमन्यासातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला व यानंतर व्यावसायिकांना त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. एका लाँड्री व्यावसायिकाने दुकान बंद न केल्याने त्यांच्यावर हल्ला केला. तर, खंडणीचीही मागणी केली. पोलीसांनी दोघा गुंडाना (Hooliganism in Pune) पकडले असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी शिवराज शिंदे, मन्या उर्फ मनोज चांदणे व निखील इंगळे (रा. नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार पसार झाला. याबाबत अनिल भुवड (वय 40) व समिर रानवडे (वय 29) या दोघांच्या तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी रात्री 8 ते 9 या वेळेत या घटना घडल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज शिंदे व मन्या उर्फ मनोज हे पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या दोघांचेही पोलीस रेकॉर्ड आहे. दरम्यान, पुर्ववैमन्यासातून या टोळक्याने समिर रानवडे यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ केली व त्यांना हाताने मारहाण केली. तक्रारदार तेथे आल्यानंतर आरोपींनी (Hooliganism in Pune) त्याला पकडून ठेवत शिवराजने त्याच्यावर कोयत्याने वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हा वाद झाल्यानंतर टोळके झील कॉलेज चौकातील मोहोळ हाईट्स या भागात हातात कोयते घेऊन आले. त्यांनी परिसरात गोंधळ घालून व्यावसायिकांना दुकान बंद करण्यास भाग पाडले. तर, नागरिकांना शिवीगाळ करत परिसरात दहहशत माजविली.  तक्रारदार अनिल भुवड यांनी त्यांचे दुकान बंद न केल्याने टोळक्याने त्यांनाही कोयत्याने मारून जखमी केले आहे. अधिक तपास सिंहगड रोड (Hooliganism in Pune) पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.