मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Sea Food Festival : खास मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी हॉटेल रागामध्ये चमचमीत ‘सी फूड फेस्टिव्हल’

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू जग बाहेर पडू लागले आहे. न्यू नॉर्मल लाइफ सुरु होऊ लागले आहे. सगळं सुरळीत सुरु होत असतानाच अचानकपणे कोंबड्यांवर संक्रांत आली. बर्ड फ्लूच्या साथीने जोर धरला. त्यामुळे चिकन, अंडी खाण्यावर निर्बंध आले. पण पाण्यातील माशांना अशी कोणतीच साथ येत नसल्याने खऱ्या मत्स्यप्रेमींना कोणतीच आडकाठी नाही. आणि याच गोष्टीची खवय्यांना जाणीव करुन देण्यासाठी प्राधिकरण येथील हॉटेल रागामध्ये सध्या ‘सी फूड फेस्टिव्हल’ जोरात सुरु आहे.

 

हॉटेल रागा येथे गेल्यानंतर समोर आलेल्या मेन्यूकार्डवर नुसती नजर टाकली तरी डिशेसमधील वैविध्य लगेच लक्षात येईल. सूपमध्ये ‘चिली क्रॅब सूप’, ‘सी फूड पेपर रस्सम’, ‘प्रॉन्स अँड वाइन सूप’ हे ऑप्शन येथे आहेत. त्यानंतर स्टार्टर्समधली ‘पॅन्को फ्राइड प्रॉन्स’ ही डिश मस्ट ट्राय मध्ये सामील होणारी. याशिवाय ‘सी फूड चिप्स’देखील आहेतच. याशिवाय प्रॉन्स, रानी माछ, सुरमई स्लाइस, बोंबिल, ‘स्क्विड’ ज्याला आपण बोलीभाषेत ‘माकली’ असे म्हणतो ते देखील येथे आहे. तसेच पापलेट, सी फूड प्लॅटर, प्रॉन्स प्लॅटर, सुरमई प्लॅटर देखील आपल्यासाठी उपलब्ध आहे. तंदुरीमध्ये लॉबस्टर, जम्बो प्रॉन्स, क्रॅब, बेबी सुरमई, पापलेट आणि रानी मच्छी येथे आहेत.

त्यानंतर येणा-या मेन कोर्समधील अनेक डिशेसची तर आपण चव घ्यायलाच हवी. यात ‘प्रॉन्स मोईली’, ‘दोई माछ’, ‘मच्छी कोफ्ता करी’, ‘मच्छी कढी’ मस्ट ट्राय प्रकारातील. याशिवाय बॉम्बे करी किंवा रस्सामध्ये देखील सर्व प्रकारच्या माशांचे ऑप्शन आहेत. खमंग फिशवर मनसोक्त आडवा हात मारुन झाल्यावर फिशनेच जेवणाचा शेवट करण्यासाठी देखील चिली सी फूड राइस, प्रॉन्स बिर्याणी, मच्छी बिर्याणी आहेच.

एकतर सध्या मासे मुबलक मिळतात आणि ते खाण्यावर कोणतेही बंधन नाही. Fish never gets Flue because they lives in Water ही या सी फूड फेस्टिव्हलची टॅगलाईन असलेल्या प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये एरवी देखील ऑथेन्टिक सी फूड मिळतेच. सध्या तर काय येथे फेस्टिव्हल सुरु आहे. त्यामुळे येणारा विकेंड चमचमीत सी फूड खाऊन सत्कारणी लावायचा असेल तर लवकरात लवकर हॉटेल रागाला भेट द्यायलाच हवी.

हॉटेल रागा,
स्विमिंग पूलजवळ, प्राधिकरण, आकुर्डी,
फोन – ८८८८०७७७९९, ०२०२७६५७७९९

spot_img
Latest news
Related news