Crime News : थेरगाव उद्यानात आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – उद्यानात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलावर एकाने बलात्कार (Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार थेरगाव येथील बापूजीबुआ उद्यान येथे  रविवारी (दि.17) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडली.

 

 

मुलाने आपल्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर घटना (Crime News)  समोर आली. त्यानुसार एका अज्ञात इसमावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा हा रविवारी बागेत खेळ्यासाठी गेला असता दाढी व मिशी असणाऱ्या अनोळखी इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलाला जवळ (Crime News) बोलावले.यावेळी त्याने मुलाला जवळच्या झाडीत नेऊन त्याच्यावर अत्याचार केले. वाकड पोलिसांनी बाललैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

Pune Crime News : घर खाली करण्यावरून वाद,भाडेकरू आणि घरमालकाचे एकमेकांवर खुनी हल्ल्याचे आरोप

 

 

आपल्या मुलाला किंवा मुलीला एकटे उद्यानात खेळायला सोडू नये तसेच त्यांच्यावर सतत नजर ठेवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर दुसरीकडे याप्रकारामुळे उद्यानांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.