Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये आग

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी परिसरातील (Bhosari MIDC) टी ब्लॉकमध्ये एका कंपनीला आग लागली आहे. घटनास्थळी भोसरी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

 

 

 

 आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले आहेत. युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले असून तेथे बघ्यांची गर्दी जमली आहे. आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही. अग्निशमन विभागाने (Bhosari MIDC) वल्लभनगर मुख्य केंद्राचे दोन, चिखली आणि भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. घटनेतील जखमींची माहिती अद्याप समजू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.