MLA Ramesh Latke : एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज : मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचे निधन झाले.

शिवसेना कार्यकर्त्यापासून मुंबई महापालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास ध्येयनिष्ठ, पक्षनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ लोकसेवकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. संमिश्र लोकवस्तीच्या अंधेरी-पूर्व मतदारसंघातून सलग मिळवलेला विजय त्यांची लोकप्रियता, जनतेशी जूळलेली घट्ट नाळ दाखवणारा आहे.

आमदार रमेश लटके यांचं निधन ही त्यांच्या मतदारसंघाची, महाविकास आघाडीची हानी आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या शिवसैनिक, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी आपल्यातून निघून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार रमेश लटके यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

Pune News : दळवी हॉस्पिटलमध्ये तातडीच्या प्रसूती ऑपरेशनची सुविधा द्या – ‘आप’ ची मागणी

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, आमदार रमेश लटके लढवय्या शिवसैनिक होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली होती. त्याच जोरावर ते आता सलग दोनदा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चांगला संपर्क असणारा, विकास कामांचा ध्यास घेतलेला, प्रांजळ, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अकाली निधन हा त्यांच्या कुटुंबीयांवर आघात आहे. लटके कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.