Pune News : टीईटी परीक्षेबाबत धक्‍कादायक माहिती ; तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पात्र

एमपीसी न्यूज : टीईटी परीक्षा संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे आयुक्त तुकाराम सुपे माजी आयुक्त सुखदेव ढेरे यांच्यासह सात ते आठ जणांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून तब्बल 7800 परीक्षार्थी कडून पैसे घेऊन त्यांना पात्र केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तपास सुरू असताना आरोपींनी तब्बल सात हजार आठशे सरांकडून पैसे घेऊन त्यांना टीईटी परीक्षेसाठी पात्र केले. आगामी काही दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागातील मोठे अधिकारी या कटात सामील आहेत. त्यांनीच पैसे घेऊन परीक्षार्थींना पास केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसे घेणारे दलाल आता पोलिसांच्या रडारवर आहेत. अटकेत असलेला जीए टेक्नॉलॉजीचा अश्विनीकुमार याने पोलिस तपासात अभिषेक सावरीकरने पाच कोटी रुपये दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता त्या अनुषंगाने पुढे पोलीस पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.