Pimpri News : श्रीमती लक्ष्मीबाई नारायण मोढवे-पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज –  श्रीमती लक्ष्मीबाई नारायण मोढवे-पाटील ( वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 

अतिशय कष्टाने त्यांनी मोढवे-पाटील परिवारामधील पाच मुलांचा सांभाळ केला. अलीकडेच त्यांनी नवीन वास्तूचे निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने मोढवे-पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पाठीमागे पाच मुले, सून नातवंडे आणि भाऊबंद नातेवाईक असा मोठा परिवार आहे.

अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी 4 वाजता सिनानदी तीरावर होणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुद्धा स्व. लक्ष्मीबाई मोढवे-पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.