Pune News : म्हणून छोट्या भावाचा झोपेतच चिरला गळा, हडपसरमधील त्या खुनाचे गूढ उकलले

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरात काल सकाळी बाबू उर्फ शिवाजी गवळी (वय 23)  या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून मोठ्या भावानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वारंवार पैसे मागत असल्याने मोठ्या भावाने छोट्या भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला. 

मनोज शिवाजी गवळी (वय 28)  असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि मनोज हे दोघेही भाड्याच्या घरात राहत होते. प्रदीप हा रिक्षा चालवायचा तर मनोज हा खाजगी बसेस साठी काम करत होता. प्रदीप मनोजच्या घरी राहत असल्यामुळे ते मनोजच्या पत्नीला आवडत नव्हते. यावरून देखील त्यांच्यात भांडण व्हायचे. तसेच प्रदीपच्या बाहेरखाली वर्तनामुळे, व्यसनांमुळे देखील मनोज गवळी हा कंटाळला होता. त्यामुळे सोमवारी रात्री त्याने प्रदीप झोपला असताना त्याचा गळा चिरून खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.