Dighi : अवैधरित्या दारू विक्री करणा-या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 50 हजारांचा मद्यसाठा जप्त

Social Security Squad raids hotel selling liquor illegally; liquor worth Rs. 50 lakh seized.

एमपीसी न्यूज – अवैधरित्या देशी, विदेशी आणि बिअर दारूची विक्री करणा-या एका हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. यामध्ये चालक, मालकावर गुन्हा दाखल करत 49 हजार 739 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर हॉटेलमधील ग्राहक आणि वेटरवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

शाम तापकीर, संतोष जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. हॉटेलमधील चार वेटर आणि 11 ग्राहकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस दिघी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, दिघी-आळंदी रोडवर च-होली बुद्रुक येथे द्वारका फॅमिली गार्डन या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू, बिअरची विक्री केली जात आहे.

त्यानुसार पोलिसांनी द्वारका हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून 10 हजार 240 रुपयांची रोकड, 39 हजार 499 रुपयांच्या देशी-विदेशी दारू, बिअरच्या बाटल्या असा एकूण 49 हजार 739 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हॉटेल चालक, मालकाच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हॉटेलमध्ये काम करणारे चार वेटर आणि 11 ग्राहक यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील, विशेष पोलीस अधिकारी विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, राजेश कोकाटे, गणेश करोटे, योगेश तिडके यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.