Katavi : कातवीतील आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी वडगाव शहर व नगरसेवक श्रीधर चव्हाण यांच्या वतीने कातवी (Katavi) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. नेत्र तपासणी, चष्मे वाटप, हिमोग्लोबीन, डायबेटिस तपासणी करण्यात आली.

माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर,तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर,माजी जि प सदस्य चंद्रशेखर भोसले, नगरसेवक किरण म्हाळसकर, माजी नगरसेवक शामराव ढोरे,महेंद्र म्हाळसकर,मावळ भाजपा कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, नगरसेवक दिनेश ढोरे, माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, वडगाव शहर कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, युवा नेते रवि शेटे,पै नाथा घुले, अ‍ॅड. दीपक चव्हाण,नंदू राऊत, नगरसेवक श्रीधर चव्हाण, वडगांव भाजपाचे सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्यासह वडगाव भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Kamshet news : कामशेत रेल्वे स्टेशन ते तळेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे फाटक दोन दिवस राहणार बंद

या आरोग्य तपासणी (Katavi) शिबिरामध्ये नेत्र तपासणी व ज्येष्ठांना विनामूल्य चष्मा वाटप, बालरोग तपासणी, महिलांचे हिमोग्लोबिन व डायबिटीस तपासणी करण्यात आली. शुगर व हिमोग्लोबीन 116 नागरिक, डोळे तपासणी 129 नागरिक तर लहान मुले 27 अशी एकूण 272 जणांची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रम प्रमुख युवा नेते रुपेश चव्हाण, विजय चव्हाण,हनुमंत चव्हाण, आशिष चव्हाण, विशाल चव्हाण, अविनाश चव्हाण, ओंकार चव्हाण, विराज राऊत आदी यशवंत ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.