Talegaon Dabhade News : 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार शाळांमध्ये

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने कोरोना लसीकरणाची सक्ती केल्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. दरम्यान तर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शाळामध्ये जाऊन लस देण्याची मोहीम तळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने सुरु केली आहे. सोमवार पासून ही मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा मानस आहे.  

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आत्तापर्यंत 71 हजार 947 नागरिकांनी लसीकरण पूर्ण केले असल्याचे डॉ दिनेश महालींगे यांनी सांगितले. तर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रामधून 51 हजार 124 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

तळेगाव शहर रिक्रिएशन हॉल,उपकेंद्र इंदोरी अंतर्गत माळवाडी,सुदवडी,सुदुंबरे मधून 22 हजार 374 नागरिकांनी लसीकरण केले आहे. तर उपकेंद्र निगडे अंतर्गत आंबळे,मंगरूळ,गोळेवाडी येथे 3 हजार 227 नागरिकांनी लसीकरण केले आहे. तसेच आंबी या उपकेंद्रात 14 हजार 523 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये वारंगवाडी, नवलाख उंब्रे, मिंडेवाडी, जाधववाडी,जांबवडे, वराळे , नाणोली या गावांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशान्वये सोमवार पासून वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रत्येक शाळेत जाऊन सुरु केले आहे.तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेतील 9 ते 10 वीच्या 68 विद्यार्थ्याचे लसीकरण सोमवारी करण्यात आले.

या मोहिमेचा शुभारंभ माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,सभापती ज्योती शिंदे, माजी उपसभापती शांताराम कदम,मावळचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, गुनेश बागडे, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी दिनेश महालींगे, सहाय्यक दीपक ढवळे, आरोग्य सहाय्यिका मंगल धायगुडे, रेखा कांबळे, नवनाथ पानसरे, मुख्याध्यापक अमोल पाटील आदी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थी लसीकरण मोहीम तळेगाव शहर परिसरातील 22 शाळांमधील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणार असल्याचे वैद्याकीय अधिकारी महालिंगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.