Pimpri News : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल डिजिटल एज्युकेशन

धनंजय भालेकर यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्या वतीने रूपीनगर तळवडे प्रभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयडिअल स्टडी ॲप’ संदर्भात माहिती देऊन ते ॲप विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये मोफत इंस्टॉल करून देण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहे. इयत्ता पहिली पासून ते ग्रज्युएशन पर्यंत सर्वच विद्यार्थी मोबाईल तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास करीत आहेत.

यामुळे धनंजय भालेकर यांच्या वतीने रूपीनगर तळवडे प्रभागातील ‘ज्ञानदीप विद्यालय, राजा शिवछत्रपती विद्यालय,नवमहाराष्ट्र विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयडिअल स्टडी ॲप’ मोफत इंस्टॉल करून देण्यात आले.

या ॲपमध्ये दहावीचा संपूर्ण पाठ्यक्रम टेक्स बुक, नोट्स, प्रश्न उत्तर सहित विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अनेक फीचर्स आहेत. या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुबोध गलांडे गोवर्धन चौधरी, बापु गैड पर्यवेक्षक शिंदे सर, तसेच ‘आयडिअल स्टडी ॲप’ चे कामत सर, वृंदा मॅडम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.