Sudwadi : ग्रामपंचायत भागात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी – उपायुक्त रामदास जगताप

एमपीसी न्यूज – गावाच्या सुनियोजित (Sudwadi) व शाश्वत विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपायुक्त रामदास जगताप यांनी केले.

निमित्त होते सुदवडी येथील नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थांनचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील होते.

यावेळी जगताप म्हणाले, प्रत्येक गावच्या सरपंचाने आपल्या भागात अनाधिकृत प्लॉटिंग होयू देवू नये तरच आपलं गाव अनाधिकृत बांधकाम मुक्त राहील. पीएमआरडीएने नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध  केला असून लवकरच हा आराखडा मंजूर होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

कोणीही यापुढे अनधिकृत बांधकाम करू नये आणि पीएमआरडीएने मंजूर केलेल्या मंजूर रेखांकानातील भूखंड गृह बांधणीसाठी नागरिकांनी खरेदी करावेत. यामुळे गावच्या विकासासाठी मोठे रस्ते, खुले क्षेत्र व पुरेशे सुविधा क्षेत्र उपलब्ध होईल. प्राधिकरणाबद्दल ग्रामस्थांच्या मनात खूप गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावे हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी आलो आहोत, असे देखील त्यांनी नमूद केले.

Pune : वाघोली येथे 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; आरोपीचे नाव, हल्ल्याचे कारण सांगून तरुणाने सोडला जीव

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता शहरी विकासातील भागीदार व्हावे. 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्राचे सर्व शेतकरी एकत्र (Sudwadi) आले तर त्याच्या विकासाठी व नियोजानासाठी पीएमआरडीए संपूर्ण सहकार्य करेल असे देखील रामदास जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी सहा वर्ष राज्यातील शेतकर्यासाठी महत्वाचा असणारा सातबारा संगणीकृत करून ऑनलाईन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले म्हणून आज सर्वसामान्य लोकांना पंधरा रुपयात ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीत सातबारा मिळतो. यासाठी कृतज्ञता व्यक्त करीत संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी सरपंच आणि उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांना पुढील विकासासाठी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात काशीद म्हणाले निवडणूक झाली आता सरपंच, उपसरपंच सदस्य हे गावचे आहेत. कोणत्याही पक्षाचे पॅनलचे नाही, सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास करायचा आहे. भविष्यकाळात श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिरामुळे येथील आसपासच्या 50 गावचा विकास झपाट्याने होणार आहे. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिराचे 50 टक्के काम पूर्ण झालेले आहे.  उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करतो आणि संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकांमध्ये शांताराम कराळे पाटील यांनी सुदवडी गावच्या दहा कोटीच्या विकास आराखड्याच्या उद्दिष्टां संदर्भात माहिती दिली.

बाबाजी खेडेकर यांनी पॅनल बाबत मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सरपंच सुमित कराळे, उपसरपंच वैभव गाडे, सदस्य गुलाब कराळे, आकाश गोतरणे, सायली कराळे, वैशाली शिंदे, प्रीती शिंदे, उद्योजक विजय बोत्रे, नगरसेवक संतोष भेगडे, आदर्श सरपंच संदीप काशीद, बाजार समितीचे सदस्य दिलीप शेठ ढोरे, माजी सरपंच गोरख गाडे, युवा कीर्तनकार गजाननराव कराळे पाटील, माजी उपसरपंच नितीन ताठे, विश्वस्त रामभाऊ कराळे, दत्तोबा कराळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानोबा कराळे, माजी उपसरपंच बाळासाहेब कराळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कराळे, आवतार शिंदे,विठ्ठल कराळे तसेच महिला आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल कराळे यांनी केले, आभार उपसरपंच रमेश कराळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.