Supreme Court on NCP : तुम्ही शरद पवार यांचे नाव आणि फोटो का वापरता; सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे धरले कान

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव(Supreme Court on NCP )आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (गुरुवारी, दि. 14) सुनावणी पार पडली. या सुनावणी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान धरले.
शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. सिंघवी (Supreme Court on NCP )यांनी अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरला जात असल्याचे सांगत त्याबाबतचे पोस्टर्स देखील न्यायालयात दाखवले. शरद पवार यांच्या लोकप्रियतेचा फायदा अजित पवार गटाकडून घेतला जात आहे. ही शरद पवार गटाची फसवणूक असल्याचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.

OTT Platforms Blocked : 18 ओटीटी, 19 वेबसाईट, 10 अॅप्स, 57 सोशल मिडीया अकाउंट ब्लॉक

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाचे कान धरले. तुम्ही त्यांच्या फोटो आणि नावाचा का वापर करता, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. तुम्ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शरद पवार यांचा फोटो किंवा चिन्ह वापरु शकत नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.
शरद पवार यांचे नाव आणि चिन्ह वापरणार नाही, असे लेखी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले आहे. त्यावर आम्ही शनिवारी  प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (दि. 18 मार्च) होणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.