Baramati News : बारामतीत मध्यरात्री लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात

एमपीसी न्यूज : इंदापूरच्या तलाठ्याला बारामतीमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. हक्क सोड पत्र ची नोंद करण्यासाठी या तलाठ्याने 18 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.  शेवटी बारा हजार रुपये स्वीकारताना सोमवारी मध्यरात्री या तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, त्यातील तक्रारदार व्यक्तीने हक्क सोड पत्र ची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाची नोंद करण्यासाठी प्रवीण भगत या तलाठ्याने अठरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सोमवारी मध्यरात्री बारामतीत सापळा रचला.

प्रवीण भगत हा इंदापूर तालुक्यातील कुरवली गावचा तलाठी असला तरी तो बारामती मध्ये राहतो. त्यांनी तक्रारदार व्यक्तीला पैसे घेऊन घरी बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रवीण भगत यांच्या घराजवळ सापळा रचला होता. लाचेचे बारा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.