Lonavala News : ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ लोणावळ्यात अमंलबजावणी सुरू 

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच लोणावळ्यात प्रवेश मिळणार आहे. सोमवारपासून शहरात याची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहरातील प्रवेशद्वारावर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी वाहनांमधील नागरिकांची तपासणी करण्यात येत असून ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच शहरात प्रवेश दिला जात आहे. 

कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने सतर्क झालेल्या लोणावळा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तपासणी नाक्यावर ज्यांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपल्यानंतरही डोस घेतला नाही त्यांना तात्काळ तपासणी नाक्यावर दुसरा डोस दिला जात आहे. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल व त्यांच्या टिमने सोमवार सकाळपासून ही मोहिम सुरु केली आहे.

खंडाळा येथील शारदा हॉटेल व वलवण गावातील सेंटर पॉईट येथे सदर तपासणी नाके लावण्यात आले आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौकात तपासणी नाका लावत नागरिकांची रॅपिड अॅन्टीजन तपासणी सुरु करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.