Talegaon Dabhade : शालेय विद्यार्थ्यांना कै. बबनराव मारूती कलावडे प्रतिष्ठानतर्फे वाढदिवसानिमित्त्त दप्तर भेट

एमपीसी न्यूज- स्वराज विक्रम कलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कै. बबनराव मारूती कलावडे प्रतिष्ठान,वारंगवाडी यांच्या वतीने वारंगवाडी व राजपुरी शाळेतील मुलांना दप्तर भेट देण्यात आले.

ग्रामीण भागातील जि. परिषद शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कै. बबनराव मारूती कलावडे प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दप्तर पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून आला.

यावेळी विक्रम कलावडे, रामनाथ घोजगे, संजय वारींगे, दत्तात्रय कलावडे, ग्रामपंचायत सदस्य किसन शिंदे, भाऊ शिंदे, सचिन वारिंगे, देवीदास पोटवडे, आत्माराम शिंदे, महेंद्र बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.