Talegaon Dabhade : लॅटिस सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील लॅटिस सोसायटीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रतिमेचे पूजन, ज्योत प्रज्वलन, शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, मानवंदना आणि व्याख्यान आदी कार्यक्रम शिवजयंती निमित्त घेण्यात आले. भारताच्या विविध प्रांतातून आलेल्या इथल्या रहिवाशांचे शिवविचारांनी प्रबोधन करण्यात आले.

या वर्षी लॅटिस सोसायटी ” तळेगाव दाभाडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ” शनिवार (दि.19) रोजी साजरी करण्यात आला.

सकाळी ठीक 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व ज्योत प्रज्वलन.
सायंकाळी 4:30 शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा, 5 ते 7 रुद्राक्ष ढोल पथक यांची मानवंदना, 7 ते 8 शिव व्याख्याते प्रमोद बोराडे सर यांचे व्याख्यान झाले.8ते 9 सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

लॅटिस सोसायटी मधील सर्व शिवभक्तानी सहभागी होऊन आपला कार्यक्रम यशस्वी केला. विशेषबाब म्हणजे लॅटीस सोसायटीमध्ये देशांमधील वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी असल्यामुळे त्यांनी देखील त्यांच्या प्रांतातील वेशभूषा केली होती.
कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ह्या सोहळ्यासाठी लॅटीस सोसायटी मधील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.