Dehuroad News : राष्ट्रवादीचे धीरज नायडू यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धीरज नायडू यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.

 

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, देहूरोड शहर भाजपाचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर उध्दवराव शेलार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.