Talegaon News: धनंजय उर्फ मंदार कटककर यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील (Talegaon News)
उद्योजक धनंजय उर्फ मंदार कटककर (वय 50) यांचे अल्पशा आजाराने काल (गुरुवारी) वाकड येथील लाईफ पॉईंट हॉस्पिटल वाकड येथे निधन झाले आहे.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगी , आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका शकुंतला कटककर यांचे ते चिरंजीव होत.

अत्यंत मनमिळाऊ व मदतीस धावून जाणाऱ्या कै.धनंजय यांच्या अकस्मात झालेल्या निधनाने तळेगाव शहरात मित्र परिवारात शोक व्यक्त केला जात आहे. सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील  मान्यवरांनी धनंजय कटक्कर यांना (Talegaon News)
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
https://youtu.be/tWzR084iQww

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.