Talegaon : विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोणतेही कारण नसताना दुचाकीवरून घराबाहेर फिरणाऱ्या एका तरुणावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शंकर किसन तिडके (वय 25, रा. आडे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश संबंधित प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

बुधवारी (दि. 8) दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी शंकर दुचाकीवरून फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 271, 290, यासह महाराष्ट्र कोव्हीड 19 विनियमन 2020 चे कलम 11, राष्ट्रीय आपत्ती कलम 57 (ब) ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.