Tata Motors : टाटा मोटर्स ने जानेवारी महिन्यात 81 हजार युनीटस ची केली विक्री

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स यांनी जानेवारी महिन्यात 81 हजार युनीटसची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या मानाने 6.4 टक्क्यांनी विक्रीमध्ये वाढ झालेली आहे.(Tata Motors) गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 76 हजार 210 युनीटची विक्री झाली होती.
यात डोमेस्टीक सेल हा 79 हजार 681 युनीटची विक्री केली आहे गेल्या वर्षी डोमोस्टीक सेल 72 हजार 485 एवढी विक्री झाली होती. यावर्षी 10 टक्के नी वाढ झाली आहे. तर कमर्शीअल व्हेईकल विक्रीमध्ये मात्र थोडी घसरण झाली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 35 हजार 268 युनीटची विक्री झाली होती. या महिन्यात मात्र 32 हजार 780 युनीटसची विक्री झाली आहे. जी गेल्यावर्षीच्या मानाने 7 टक्क्यांनी घसरण मानली जात आहे.
Shivai Bus : मुंबई-पुणे मार्गावर धावणार पर्यावरणपूरक 100 शिवाई बस
पॅसेंजर व्हेईकल कॅटेगरी चा विचार करायचा झाला तर एकूण पीव्ही डोमेस्टीक (ईव्ही व्हेईकलसह) युनीटच्या विक्रीत 18 टक्केंनी वाढ झाली असून या महिन्यात 47 हजार 987 युनीटस विकले गेले आहेत. पीव्ही आयबी युनीटसमध्ये 83 ट्क्क्यांनी वाढ झाली असून गेल्यावर्षी केवळ 165 युनीट (Tata Motors) विकले गेले होते ते यावर्षी एका महिन्यात 302 विकले गेले आहेत. तर ई व्ही (आयबी + डोमेस्टीक) व्हेईकल विक्रीत 39 टक्केंनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी केवळ 2 हजार 982 युनीटस विकले गेले होते यंदा जानेवारीमध्ये 4 हजार 133 युनीटस विकले गेले आहे.