Pune Crime News : गाडीवरून कचरा फेकणाऱ्यामुळे ‘त्या’ बाप लेकीचा जीव गेला

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर परिसरात मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या एका दुचाकीला मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला होता. या अपघातात निलेश साळुंखे आणि मीनाक्षी साळुंखे या दोघांचा (Pune Crime News) मृत्यू झाला होता. संतापजनक म्हणजे हा अपघात निलेश साळुंखे यांच्यासमोर असणाऱ्या दुचाकी चालकांनी दुचाकीवरूनच कचरा फेकला. हा कचरा अंगावर पडू नये म्हणून निलेश यांनी आपल्या बाईकचा स्पीड कमी केला. त्यामुळेच हा अपघात झाला. 

 

 

निलेश साळुंखे मंगळवारी सकाळी मुलगी मीनाक्षी साळुंखे हिला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने जात होते. हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर या ठिकाणी त्यांच्यासमोर असलेल्या दुचाकी चालकाने गाडीवरूनच कचरा फेकला. हा कचरा अंगावर पडू नये म्हणून निलेश यांनी दुचाकीचा वेग कमी केला होता. इतक्यात पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक (Pune Crime News)  दिली. यामध्ये निलेश हे कंटेनर खाली सापडले तर मीनाक्षी ही चिमुरडी जोरात रस्त्यावर आपटली. निलेश यांचा जागीच मृत्यू झाला तर मीनाक्षी हिला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.

 

Inner Wheel Club : इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी वैशाली दाभाडे

 

हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कंटेनर चालकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.