Inner Wheel Club : इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या (Inner Wheel Club) अध्यक्षपदी वैशाली प्रमोद दाभाडे यांची निवड करण्यात आली. इनर व्हील क्लबचा 25 वा पदग्रहण समारंभ रविवारी (दि. 17) सुशीला मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला.

 

डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. मुक्ती पानसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अनुप्रिया खाडे यांनी स्वागत गीत सादर केले. मावळत्या अध्यक्षा काजल गारोळे यांनी प्रास्ताविक व गेल्या वर्षातील कामांचा अहवाल सादर केला व वैशाली दाभाडे यांना कॉलर प्रदान करून अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

 

Sanjay Pande: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक

 

नूतन कार्यकारणीमध्ये सचिव निशा पवार, उपाध्यक्ष संध्या थोरात, खजिनदार अनुप्रिया खाडे, आय एस ओ अर्चना देशमुख, संपादक दीपाली चव्हाण, क्लब करस्पोन्डन्स जयश्री नामदेव दाभाडे यांची निवड जाहीर करण्यात आली.

 

पदग्रहणानंतर नूतन अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी आपल्या मनोगतातुन (Inner Wheel Club) वर्षभर करण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.समाजात उल्लेखनीय कामगिरी करत असणाऱ्या क-हाड येथील माई चॅरिटेबल ट्रस्टच्या  संगीता माई साळुंके यांना सर्विस एक्सइलेन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. नवीन 14 सदस्यांना क्लबची शपथ देण्यात आली. प्रमोद दाभाडे यांनी नूतन अध्यक्षा व कार्यकारणीला शुभेच्या दिल्या. अलभा पारेख यांनी क्लबच्या मागील 25 वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. मागील सर्व माजी अध्यक्ष व नूतन अध्यक्षा यांची रॅली काढून त्यांचा मुक्ती पानसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Today’s Horoscope 20 July 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

 

अध्यक्षीय भाषणात मुक्ती पानसे यांनी तळेगाव दाभाडे क्लबच्या कामाचे कौतुक केले. प्रास्ताविक भारती शाह यांनी, तर आभार उपाध्यक्ष संध्या थोरात यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, अनेक शैक्षणिक संस्थांचे सदस्य व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.