Mhalunge News : ‘त्या’ अपघात प्रकरणात पळून गेलेला चालकास अखेर बेड्या

एमपीसी न्यूज – पादचा-याला धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाला म्हाळुंगे पोलिसांनी 2 जानेवारी रोजी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे दोन दिवसांत पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. 30 जानेवारी रोजी हा अपघात झाला होता.

संजय दिलीप काळे (वय 30, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरारी विष्णुपंत कालेकर हे देहुगाव ते येलवाडी रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली व वाहन चालक वाहनासह फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या कालेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी पळून गेलेल्या चालक आरोपीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन त्याला 2 जानेवारी रोजी अटक केली. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीची 14 दिवसांची मॅजेस्टिक कस्टडी घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.