Pimpri News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 20 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2022 दरम्यान इन्स्टाग्रामवरती हा प्रकार घडला.

याप्रकरणी पिडित महिलेनं गुरुवारी (दि.03) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार busmanbaba2 या इन्स्टाग्राम अकाउंट विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने busmanbaba2 इन्स्टाग्राम अकाउंट वरुन पिडीत महिलेला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.