Crime News : तोंडावर स्प्रे मारून गळ्यातली सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – तोंडावर स्प्रे मारून एका व्यक्तीची सोनासाखळी हिसकावण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.20) मध्यरात्री दीड वाजता पुण्यातील लक्ष्मी रोड येथे घडली आहे.

याप्रकरणी सुनिल कुंभार (वय 30 रा. कोथरूड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार तीन अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Khadakwasala News : खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये 6 हजार 420 क्यूसेक विसर्ग

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डेकोरेशन कंपनीमध्ये सुपरवायजर म्हणून कामाला आहेत.दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर तेथील डेकोरेशनचे सामान टेम्पोत टाकून ते पायी त्यांच्या कारपर्यंत जात होते.याच वेळी तीन जण दुचाकीवरून तेथे आले व त्यांनी कसला तरी स्प्रे फिर्यादीच्या तोंडावर मारला व त्यांच्या गळ्यातील 1 लाख रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली.फिर्यादी यांनी डोळे साफ करून पाहिले मात्र तोपर्यंत चोर तेथून पळून गेले होते.यावरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.