Crime News : तडिपार गुंडावरील हल्ल्यातील एकाला अटक

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे तडिपार गुंडावर केलेल्या हल्ल्यातील एकाला वाकड पोलिसांनी अटक केली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.20) रात्री पावणेनऊ वाजता घडली होती.

रविराज  उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार (वय 24 रा.ताथवडे) यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गणेश नितीन शेळके (वय 24 रा. ताथवडे), आदित्य रमेश चांदणे (वय 23 रा.ताथवडे), धनंजय महेश दाखले (वय 24), अनिकेत शिंदे उर्फ मोण्या (वय 20) यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गणेश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रविराजच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविराजच्या घराच्या मागे राहणारा शेळके याने रविराजला आवाज देऊन घराबाहेर बोलण्यासाठी बोलावले.रविराज आला असता गणेश व त्याच्या मित्रांनी त्याला बोलण्यात गुंतवले जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी चाकू व कोयत्याने रविवराजवर वार करण्यास सुरुवात केली.शिवगाळ करत आम्ही तुला जिवंत सोडणार नाही म्हणत कोयत्याने डोक्यावर व छातीवर वार केले. रविवराज तेथून पळत जात होता मात्र चिखलाने पाय घसरून तो खाली पडला. तेथे जाऊनही आरोपींनी त्याच्यावर पुन्हा वार केले.

रविराजला खसागी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत. रविराज याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.मात्र त्याने कायदा मोडून शहरात प्रवेश केला व त्याच्यावर हा जिवघेणा हल्ला करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.