Nigdi News : निगडी मध्ये शहरातील सर्वात मोठा किल्ला, बालचमूंनी साकारली प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती 

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील वीर सावरकर उद्यानासमोर दिपावली निमित्त प्रतापगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या असलेल्या ‌या किल्ल्याच्या माध्यमातून लहान मुलांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास उलगडला जात आहे. किल्ल्याच्या प्रतिकृतीचे रविवारी (दि.31 सकाळी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, प्रशांत मोरे, रुपेश मोरे, व्यंकटेश काळे, जयेश मोरे, प्रसाद जोगळेकर, प्रवीण कोल्हे, राजेश कडू, बशीर नदाफ, सागर सोनावले, मुकुंद काटे, वैभव नाईकरे, संजय छाजेड आदी उपस्थित होते.‌

शिवभुमी प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यमान नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या वतीने हा किल्ला साकारण्यात आला आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना शर्मिला बाबर म्हणाल्या, ‘दिपावली हा उत्साह, आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणात बालचमू म्हणजेच लहान मुलांचा आवडता विषय म्हणजे गड-किल्ले बनविणे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार प्रतापगड किल्ला आहे.

मुलांसाठी या किल्ल्याची शहरातील सर्वांत मोठी 30 फूट लांब आणि 20 फूट रुंद या आकाराची ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी मुर्ती, सजावटीच्या माध्यमातून शिवरायांच्या जिवनातील प्रसंग दाखविण्यात आले आहेत. 7 नोव्हेंबर पर्यंत हा किल्ला मुलांना व‌ नागरिकांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.