India Corona Update : ॲक्टिव्ह रुग्ण संख्या घटली, देशात 2,07,653 उपचाराधीन रुग्ण   

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 15 हजार 823 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 22 हजार 844 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या घटली असून, सध्याच्या घडीला देशात 2 लाख 07 हजार 653 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 40 लाख 01 हजार 743 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 33 लाख 42 हजार 901 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 226 रुग्ण दगावले असून, आजवर 4 लाख 51 हजार 189 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.06 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 58 कोटी 63 लाख 63 हजार 442 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 25 हजार 399 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 95 कोटी 43 लाख 79 हजार 212 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 50 लाख 63 हजार 845 जणांनी लस घेतली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.