India Corona Update : देशातील कोरोना बाधितांची संख्या अडीच कोटींच्या घरात

बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिकच 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. देशात गेल्या 24 तासांत तीन लाखांहून कमी रुग्णांची नोंद झाली असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असले तरी देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीच कोटींच्या घरात गेली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 81 हजार 386 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 11 लाख 74 हजार 076 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 78 हजार 741 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 35 लाख 16 हजार 997 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 106 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.09 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 84.81 टक्के एवढा झाला आहे.
देशात आजवर 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 73 हजार 515 चाचण्या रविवारी (दि.16) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.