Chakan Crime News : दुकानदाराला दोघांची मारहाण, जीवे मारण्यासह दिली दुकान पेटवण्याची धमकी

एमपीसी न्यूज – सरकारी मोजणीस हरकत का घेतली म्हणून दोघांजणांनी एका दुकानदाराला मारहाण केली. तसेच, त्याला जीवे मारण्यासह दुकान पेटवण्याची धमकी दिली. खराबवाडी, खेड येथे मंगळवारी (दि.22) दुपारी एक वाजता ही घटना घडली.

राहुल नामदेव माने (वय 36, रा. मोशी, मुळगाव उस्मानाबाद) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाऊसाहेब चंद्रकांत खराबी, दिपराज भाऊसाहेब खराबी ( दोघेही रा. खराबवाडी, खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांचे खराबवाडी येथे दुकान आहे. मंगळवारी दुपारी राहुल हे त्यांच्या दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी भाऊसाहेब व दिपराज त्याठिकाणी आले. आरोपींनी फिर्यादी यांना सरकारी मोजणीला हरकत का घेतली अशी विचारणा केली व त्यांच्या डोक्यात, गालावर, छातीवर मारहाण करून दुखापत केली. फिर्यादी तारेवर पडल्याने त्यांची करंगळीला दुखापत झाली. फिर्यादी दुकानात गेले असता त्यांना दगड फेकून मारला तसेच, दुकान पेटवून देण्याची व आणखी मुलं आणून जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.