Talegaon Dabhade News : पत्रकारांचे काम समाजाला प्रेरक असते – सतीश दिघे

एमपीसी न्यूज – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विधायक आणि निर्भीड पत्रकारीता केली. समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. आणि त्यांचे काम समाजाला प्रेरक असते, असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी केले. 

तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या अभिवादन सभेत दिघे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, नगरसेविका शोभा भेगडे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर,संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे,सचिव सोनबा गोपाळे गुरूजी, बी.एम.भसे, सुनील वाळुंज, तात्यासाहेब धांडे,प्रभाकर तुमकर,अतुल पवार श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दिघे म्हणाले की, समाजातील चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतात. आणि त्यांचे काम समाजाला प्रेरक असते. आपल्या संघाच्या  पत्रकाराकडूनच ते काम होत असल्याबाबतचे गौरवोद्गार दिघे यांनी काढले. तर समाजामध्ये लोकजागृती करण्यासाठी पत्रकारांनी सदैव तत्पर राहीले पाहीजे असे मत नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी व्यक्त केले तर समाजपरिवर्तनासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा असे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  मधुकर सावंत म्हणाले.

पत्रकार दिनानिमित्त तळेगाव दाभाडे शहर परिसरातील अनेक संस्था-संघटना व्यक्तीकडून शहरातील पत्रकारांचा विशेष सत्कार, सन्मान विविध ठिकाणी करण्यात आला. तर तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाकडून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून विशेष सभा घेऊन साप्ताहिक अंबर कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

या सभेत स्वागत व प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखळकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची माहिती सांगितली. एस एन गोपाळे यांनी आभार मानले  तर सूत्रसंचालन अतुल पवार यांनी केले.

तळेगावातील मेधाविन फाउंडेशनच्या वतीने शहरातील पत्रकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे व त्यांच्या सर्व सदस्यांनी सर्व पत्रकारांचा सन्मान केला. भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक दाभाडे व त्यांचे सर्व सहकारी यांनीही पत्रकारांचा वृक्ष रोपे देऊन विशेष सत्कार केला.

याशिवाय नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार यांनी संस्थेच्या वतीने सर्व पत्रकारांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. तसेच वीरांगना महिला बचत गटाच्या अध्यक्ष विना दाभाडे संस्थापिका माजी नगरसेविका नीलिमा दाभाडे व सहकाऱ्यांनी पत्रकारांचा विशेष सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.