Pune Crime News : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून ऍसिड टाकण्याची धमकी

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : खुलानामा झाल्यानंतरही पत्नीचा पाठलाग करून बोलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला असता तिने विरोध दर्शवल्यानंतर तिच्या तोंडावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खडीमशीन चौकात हा प्रकार घडला. 

मोहम्मद मतालीब जनाब अली ( सिव्हिल स्टाफ रा. कमांड हॉस्पिटल, सदन कमांड, वानवडी पुणे) याच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी भादवि कलम 354 (अ) 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी यांचा दोघांच्या मर्जीने मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे खुलानामा झाला आहे. त्यानंतर दोघांनीही समजुतीचा करारनामा करून कायदेशीर फारकती साठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे.

दरम्यान असे असताना सुद्धा फिर्यादी या बुधवारी सायंकाळी खडीमशीन चौकातून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांना थांबवून, त्यांचा हात धरून मिठी मारण्याचा प्रयत्न करून ‘तुमको सच मे मेरे मे इंटरेस्ट नही है क्या’ असे म्हणाला. यावेळी फिर्यादीने त्याला जोरात ढकलले असता मी तुझ्या तोंडावर ऍसिड फेकेल अशी धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादी च्या पाठीमागे जाऊन त्या सोसायटीमधील कोणत्या फ्लॅटमध्ये राहतात त्याची वॉचमनकडे चौकशी केली आणि निघून गेला.  फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.