Bhosari News : पगारापेक्षा जास्त पैशांची मागणी करत मालकाला दिली जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – पगार दिलेला असतानाही त्या व्यतिरिक्त पैशांची मागणी करीत कामगाराने कंपनीतील अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली. (Bhosari News) हा प्रकार मंगळवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी येथील साक्षी मशीन अँड टूल्स या कंपनीत उघडकीस आला.

रवी माधव वर्तक (वय 50, रा. सुदर्शन नगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय रमेश महाजन (वय 23, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : राजमाता महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एमआयडीसी येथील साक्षी मशीन टूल्स या कंपनीत नोकरीला आहे. आरोपी देखील त्यांच्या कंपनीत कामाला होता. (Bhosari News) दरम्यान, आरोपीला नियमाप्रमाणे पगाराची रक्कम मिळाल्यानंतरही त्याने फिर्यादी यांच्याकडे दररोज पैशाची मागणी केली.

जर पैसे दिले नाही, तर जीवे ठार मारून टाकेल, गेटवर येऊन तुमच्या डोक्यात कोयता टाकीन, माझ्यावर गुन्हा दाखल केला तर, पोलीस मला आत टाकतील, मी बाहेर आलो तर मग काय होईल, ते बघून घ्या, असे बोलून दमदाटी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.