Chakan Crime News : शेतातील किरकोळ कारणावरून भावाला मारहाण; तिघा बाप लेकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भावाच्या शेतात सुरू असलेल्या ट्रॅक्टर चालकाला पाटामध्ये माती येणार नाही याची काळजी घेऊन ट्रॅक्टर चालवण्यास सांगितल्याने भावाने आणि त्याच्या दोन मुलांनी भावाला बेदम मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली.

हनुमंत लक्ष्मण काळडोके (वय 68, रा. बिरदवडी, ता. खेड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर काळडोके, सचिन ज्ञानेश्वर काळडोके, संजय ज्ञानेश्वर काळडोके (सर्व रा. बिरदवडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सकाळी शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या भावाच्या शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होते. त्यावेळी फिर्यादी यांनी ट्रॅक्टर चालकाला ‘तू जरा वरील बाजूने ट्रॅक्टर दाबून धर, म्हणजे माझ्या पाटात पाणी येणार नाही’ असे सांगितले. त्यावरून फिर्यादी यांचा भाऊ आरोपी ज्ञानेश्वर याने शाब्दिक वाद करून ढकलून देऊन मारहाण केली. ज्ञानेश्वर याने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर यांच्या दोन्ही मुलांनी देखील फिर्यादी यांना शिवीगाळ केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.