Vehicle Theft : निगडी, देहूरोडमधून तीन दुचाकी तर पिंपरी मधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी मधून सीएनजी रिक्षा, निगडीतून दोन दुचाकी आणि देहूरोड मधून एक दुचाकी अशी चार वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

समाधान माणिक म्हस्के (वय 41, रा. भीमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाजीद अलकी अन्सारी (वय 28, रा. जनता बेकरी जवळ, कोंढवा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फिर्यादी म्हस्के यांची सहा हजारांची सीएनजी रिक्षा (एम एच 14 / सी यु 0940) आरोपी अन्सारी याने म्हस्के यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 10 जानेवारी रात्री पावणे बारा ते 11 जानेवारी सकाळी आठ या कालावधीत घडला. पोलिसांनी अन्सारी याला अटक केली आहे.

निगडी पोलीस ठाण्यात कांचन दिलीप पाटील (वय 34, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 19 / ए ए 5287) निगडी मधील पवळे उड्डाणपुलाखाली असलेल्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

किरण दादू वंजारी यांनीही निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए क्यू 8528) अज्ञात चोरट्यांनी प्राधिकरण, निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या गेट समोरून सोमवारी (दि. 1) दुपारी तीन वाजताच्या सुमारास चोरून नेली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्यात रोहित रामजुवारी बिलडाण (वय 36, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जे बी 3665) त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी दुपारी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.