Maharashtra Corona Update : राज्यात आज 14,361 नवे कोरोनाबाधित, 11,607 झाले कोरोनामुक्त

Today 14,361 new corona patients in state, 11,607 patients corona free.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यात आज 14 हजार 361 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 11 हजार 607 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजवर एकूण 5 लाख 43 हजार 170 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली असून सध्या राज्यात 1 लाख 80 हजार 718 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात 11 हजार 607 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.62% झाले आहे.

राज्यात आज दिवसभरात 331 रूग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण कोरोनामुळे मृत झालेल्या रूग्णांची संख्या 23 हजार 775 एवढी झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 3.18 टक्के एवढा आहे.

राज्यात 39 लाख 32 हजार 522 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 47 हजार 995 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 01 हजार 346 लोक होम क्वारंटाइन आहेत तर, 34 हजार 908 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी सादर करावीत असं सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्या सूचनांच्या आधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.