Today’s Horoscope 1 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 1 November 2022
वार – मंगळवार.
०१.११.२०२२.
शुभाशुभ विचार-१२ नंतर चांगला.
आज विशेष- दुर्गाष्टमी, गोपाष्टमी.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण.
चंद्र राशी – मकर.

—————————————-
मेष – (शुभ रंग- लाल)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल.

वृषभ (शुभ रंग- निळा)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने थोडेफार नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील तुम्ही बिनचूक काम करा. इतरांच्या भानगडीत डोकावू नका.

मिथुन (शुभ रंग- हिरवा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही नवे उपक्रम तर उद्यावरच ढकला पती-पत्नी मधील वादावर आज मौन हा रामबाण उपाय ठरेल.

कर्क (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात आज प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्वगुणांस वाव मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देणार आहे.

सिंह (शुभ रंग- पिस्ता)
ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. काही येणी असतील तर मागायला लाजू नका गृहिणीसाठी अतिव्यस्त दिवस असून आरोग्याच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यायला हवी.

कन्या (शुभ रंग- मोरपंखी)Today’s Horoscope 1 November 2022
नोकरदारांना वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागेल. नवोदित कलाकारांच्या परिश्रमांना यश येईल, त्यांना प्रसिद्धी मिळेल. खेळाडू स्पर्धा जिंकतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज अत्यंत आनंदी व उत्साही असा दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल. संततीकडून शुभ समाचार येतील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल. आर्थिक बाजू भक्कमच असेल.

मकर (शुभ रंग- राखाडी)
महत्त्वाच्या चर्चेत आपले विचार आत्मविश्वासाने मांडाल. आत्मविश्वासाचा अतिरेक मात्र नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे इतरांचेही म्हणणे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

कुंभ (शुभ रंग – केशरी)
नवीन व्यवसायात गुंतवणूक करताना मर्यादे बाहेर रिस्क घेऊ नका. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातूनच मनशांती मिळेल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या लहरी सांभाळाव्या लागतील.

मीन -(शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील आज थोडी अहंकाराची बाधा होईल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.