Kalewadi Crime News : मध्यरात्री ट्रक चालकाला मारहाण करून लुटले, ट्रकच्या फोडल्या काचा

एमपीसी न्यूज – मध्यरात्री एका ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम चोरली तसेच, ट्रकच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. धनगर बाबा मंदीर, काळेवाडी येथे मंगळवारी (दि.22) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ऋषीकेश महादेव चव्हाण (वय 26) आणि शुभम शांताराम दुबे (वय 21) (दोघेही रा. थेरगाव) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. सुरेश ईश्वर चव्हाण (वय 38, रा. शिवडे, उंब्रज, कराड, सातारा) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश हे ट्रक घेऊन काळेवाडी फाट्याकडे जात होते. धगरबाबा मंदिराजवळ आल्यानंतर चार अनोळखी इसमांनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपी इसमांनी ट्रकची समोरील काच फोडून, चालकाच्या केबिनमध्ये येऊन चालकाचा मोबाईल, रोख रक्कम चोरी केली. तसेच, जोर जोरात ओरडत आणि हवेत तलवार फिरवत परिसरात दहशत निर्माण केली असे फिर्यादीत नमूद केले आहे, वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.