Rahatani Crime News : पूर्व वैमनस्यातून तरूणाचा खून

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी एका तरूणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास तापकीर मळ्याजवळ, रहाटणी येथे उघडकीस आली.

मृत्युंजय कुमार (वय 26, मूळ रा. बिहार) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. पंचानंद मुन्ना राम (वय 21) आणि जवाहर मांझी (दोघेही रा. मूळ बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सतीश वैजिनाथ वाव्हळ (वय 33, रा. रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मृत्युंजय आणि आरोपी यांच्यात एक महिन्यांपूर्वी दारू पिताना भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून मयत मृत्युंजय याच्या डोक्यात अज्ञात वस्तूने जबर प्रहार करून त्याचा खून केला. त्यानंतर ते दोघेजण पळून गेले. आरोपी पंचानंद याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.