Chakan News : मोशी, नाणेकरवाडी येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मोशी आणि नाणेकरवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनेत पादचारी व्यक्तींना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. याबाबत बुधवारी (दि. 6) एमआयडीसी भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

नरेश प्रकाश वाघमारे (वय 29, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे मोशी येथील अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाघमारे बुधवारी (दि. 6) रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवरून पायी चालत जात होते. शिवाजीवाडी मोशी येथे अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात वाघमारे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस हवालदार दीपक रणसौर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मिथुन प्रल्हाद राठोड (वय 22, रा. शिक्षक कॉलनी, बालाजीनगर, मदनकरवाडी, ता. खेड) असे नाणेकरवाडी येथे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि. 5) दुपारी सव्वापाच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे रस्ता ओलांडत असताना राठोड यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला, चेह-यावर, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.