-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : फरार रवींद्र ब-हाटेचे दोन फ्लॅट, बंगला आणि मोकळा प्लॉट जप्त करण्याची कारवाई सुरू

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र ब-हाटे याच्या मालकीच्या लुल्ला नगर कोंढवा, धनकवडी आणि कात्रज भागातील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश करण्याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी केले आहेत. त्यानुसार बराटेच्या या पाच मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला आज सुरुवात झाली आहे. 

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

लुल्लानगर कोंढवा येथील मधुसूधा अपार्टमेंटमध्ये असणारे दोन फ्लॅट, तळजाई पठार धनकवडी येथील सरगम सोसायटीतील मोकळा प्लॉट, सरगम सोसायटीतील एक बंगला आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन मिळकत अशा या पाच मालमत्ता आज जप्त करण्यात येणार आहेत.  जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली नमूद आदेशानुसार तहसीलदार हवेली पुणे व तहसीलदार हे ही मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करणार आहे.

बराटेसह अन्य काही आरोपीवर प्रथम कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एका पाठोपाठ अनेक गुन्हे या टोळीवर दाखल झाले आहेत. त्यात पिस्तूलाचा धाक दाखवून जागा आणि पैसे बळकावले असे, म्हंटले आहे. दरम्यान पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यात या 13 जणांवर संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. येतील 11 जणांना अटक करण्यात आली तर बराटेसह आणखी एक आरोपी फरार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.