Bhosari : भरधाव वेगात आलेल्या कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे आलेल्या कंटेनरने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे रात्री एकच्या सुमारास झाला.

संजय पुंडलिक घुगरे (वय 46, रा. स्पाईन सिटी मॉलसमोर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजाराम पुंडलिक घुगरे (वय 44) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एकच्या सुमारास राजाराम पल्सर (एम एच 14 / सी व्ही 3611) दुचाकीवरून जाते होते. मोशी येथे पुणे-नाशिक रोडवरून जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने राजाराम यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये राजाराम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून राजाराम यांचे भाऊ संजय यांनी  फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.