Wakad : काळेवाडी परिसरात टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज – काळेवाडी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने (Wakad)शस्त्रे घेऊन गोंधळ घातला. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी (दि. 3) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
रोहित प्रभाकर वाघमारे (वय 22, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ संजय जगताप (वय 19), आयुष सुनील खैरे (वय 18), हर्ष विनोद महाडिक (वय 20) आणि दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष आणि हर्ष या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सिद्धार्थ, (Wakad)आयुष, हर्ष आणि त्यांचे दोन साथीदार कोयते, लाकडी दांडके घेऊन शनिवारी मध्यरात्री नढेनगर मधील शिवकृपा कॉलनी येथे आले.
त्यांनी कोयते आणि लाकडी दांडके हवेत फिरवत रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर रोहित वाघमारे यांच्या खिशातून जबरदस्तीने 2 हजार 100 रुपये काढून घेतले. त्यांना धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.