Talawade : फ्री स्टाईल फुटबॉलचा ‘जादूगार’ जेमी नाइटचे पोद्दार स्कूलमधील विद्यार्थ्यांना फ्री स्टाईलचे धडे

एमपीसी न्यूज – जगातील अव्वल व्यावसायिक फ्रीस्टाईल फुटबॉलपटू जेमी नाइट याने सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये  तळवडे (Talawade) येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना आपली फुटबॉलवरील हुकुमत दाखवली.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वाकड तर्फे जगातील टॉप टेन फ़ुटबाँल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी पुण्याला प्रथम भेट दिली. जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहे.

पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून त्यांच्या दुसऱ्या भारत भेटीमध्ये खेळांवर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून उत्कृष्ट कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनवणे होते. यावेळी शाळेचे प्रिन्सिपॉल ऍग्नेल कार्व्हालो उपस्थित होते.

Chinchwad : राजमाता जिजाऊ महिला संमेलन उत्साहात

जेमी फुटबॉलवरील त्याच्या जबरदस्त नियंत्रणासाठी ओळखला जातो आणि त्याने जगभरात प्रवास केला आहे, प्रसिद्ध जागतिक ब्रँड्सशी सहयोग केला आहे. 2017 आणि 2018 मध्ये बॅक-टू-बॅक UEFA चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये खेळपट्टीवर कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्य आणि सूक्ष्म अंमलबजावणीमुळे त्याला जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंकडून तसेच चाहत्यानांकडून खूप प्रेम मिळाले आहे. जेमीच्या अनन्य साधरण कृतींमुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते,

जेमीचा ठाम विश्वास आहे की फ्रीस्टाइल फुटबॉल शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत करते आणि वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व शिकवते. यामुळे पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शिक्षणाला भक्कम पाठिंबा मिळतो.

यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, “पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड आहे हे पाहून खूप आनंद झाला.भारत फुटबॉल खेळात जागतिक खेळाडू बनू शकतो आणि कदाचित फुटबॉल विश्वचषकात लवकरच भाग घेईल अशी मी अशा बाळगतो.मला इथे यायला खूप आवडले आणि आशा आहे की मी लवकरच परत येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.