Wakad : ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ असे म्हणणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावरून संपर्क करत तरुणीला वारंवार त्रास देत ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ असे म्हणून तरुणीचा विनयभंग केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 3 डिसेंबर 2018 ते 24 जानेवारी 2019 या कालावधीत ताथवडे येथे घडला.

याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण तौर (रा. राहटणी. मूळ रा. शिरगाव थडी, ता. माजलगाव, जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला वारंवार मोबाईल फोनद्वारे संपर्क करत तसेच फेसबुक आणि व्हाट्सअप वरून मेसेज द्वारे शिवीगाळ केली. ‘तू माझा फोन का घेत नाहीस, मी तुला जीवे मारून टाकीन, तू माझी नाही तर कोणाचीच नाही’ अशी धमकी आरोपीने फिर्यादी तरुणीला दिली. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.