Wakad News : दुचाकीची लाईट तोंडावर पडली म्हणून महिलेला मारहाण करून विनयभंग

एमपीसी न्यूज – दुचाकीची लाईट तोंडावर पडली या कारणावरून तिघांनी मिळून दुचाकीस्वार महिलेला मारहाण केली. एका व्यक्तीने दुचाकीस्वार महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि.7) रात्री साडेआठ वाजता माउली चौक, वाकड येथे घडली.

नित्या नावाची व्यक्ती, त्याची पत्नी शारदा आणि सासू तोडेबाई (पूर्ण नावे माहिती नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी रात्री साडेआठ वाजता माउली चौक वाकड येथून दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या दुचाकीची लाईट आरोपींच्या तोंडावर पडली. या कारणावरून आरोपी नित्या याने फिर्यादी यांच्या केसाला धरून हाताने मारहाण केली. नंतर सर्वांसमक्ष खाली पाडून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. आरोपी शारदा आणि तोडेबाई यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.