Wakad : सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या लाखो रुपयांचा केला अपहार

.

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या चेकबुकचा वापर करून सोसायटीच्या खात्यातून सहा लाख 94 हजार 200 रुपये काढून अपहार केला. (Wakad) हा प्रकार 14 ऑक्टोबर 2022 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडला.

आशिष शामलाल जगडावत (वय 37, रा. थेरगाव. मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल प्रल्हाद कनगरे (वय 31, रा. थेरगाव. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : संविधानाच्या प्रती मोफत वाटण्याचा संकल्प

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोसायटीचे सचिव आहेत. त्यांच्या सोसायटीमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करत होता. (Wakad) त्याने सोसायटीच्या चेकबुकचा वापर करून सोसायटीच्या खात्यातून सहा लाख 94 हजार 200 रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.