Maval Water Issue : आंबी, गोळेवाडी, वारंगवाडी येथील पाणीप्रश्न सुटणार; नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – मुबलक पाणीसाठा नसल्याने आंबी आणि परिसरातील गावांना पाणीप्रश्न (Water Issue) भेडसावत होता. त्यावर तोडगा काढण्यात आला असून आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मिळाले आहेत. त्यामुळे आंबी, गोळेवाडी, वारंगवाडी येथील पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिलांच्या हस्ते नुकताच करण्यात आला असून आता या कामाला सुरुवात झाली आहे.

या भूमिपूजन समारंभप्रसंगी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, देहूरोड शहर अध्यक्षा अरुणा पिंजण, जेष्ठ नेते भरत घोजगे, बाबाजी घोजगे, सरपंच संगिता घोजगे, उपसरपंच सागर शिंदे, ग्रामसेवक बालाजी सुरवसे, सदस्य बाय‌डा घोजगे, सारिका धुमाळ,माधुरी जाधव, मंगल घोजगे,सुरेखा घोजगे, प्रियंका शिंदे, बाळासो बनसोडे, विक्रम कलावडे, निलेश घोजगे, समीर जाधव, दत्तात्रय वारिंगे, अतुल मराठे, रामनाथ धुमाळ, भानुदास दरेकर पाटील, रविंद्र घोजगे,माजी सरपंच वामन वारिंगे,अशोक घोजगे,अमोल बनसोडे, तसेच आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Plumbing of Domestic Customers : घरगुती ग्राहकांचे अवैध नळजोड 5 हजारांत नियमित होणार; 15 जूनपर्यंत सवलत

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत आंबी योजनेसाठी 4 कोटी 95 लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. आंबी येथे 3 लक्ष लिटर, गोळेवाडी येथे 2 लक्ष लि., वारंगवाडी येथे 1 लक्ष लि.क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आंबी गावासह गोळेवाडी, वारंगवाडी येथील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचून येथील पाण्याची समस्या (Water Issue) सुटणार आहे.

औद्योगिक क्षेत्रामुळे आंबी गावातील नागरिकीकरण वाढत आहे. आंबी आणि परिसरातील रस्ते, कचरा संकलनासाठी घंटागाडी यांसारख्या मुलभुत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढे देखील निधी देण्याचा प्रयत्न असेल, परंतु विकासकामे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रतिनिधींची सुद्धा आहे. त्यामुळे कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे, अशा मार्गदर्शक सूचना आमदार सुनील शेळके यांनी यावेळी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.